जादूटोणा कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी निवेदन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रसार आणि प्रचार आणि प्रसाराचे कार्य त्वरित सुरु करण्यातयावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भंडारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार भंडारा जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे आहेत. सचिव समाज कल्याण अधिकारी तर सदस्य म्हणून पोलीस अधीक्षक भंडारा आणि शिक्षण विभाग आहे. गेल्या चार महिन्यात या समितीमार्फत जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रसार व प्रसार करण्यात आल्याचे दिसून येत नाही. भंडारा जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रसार आणि प्रसार व्हावा. समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून भंडारा जिल्ह्यातील सतरा पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक भंडारा यांनी कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले होते .मात्र त्यापैकी फक्त चारच पोलीस स्टेशन अधिकाºयांनी कार्यक्रम घेतले. सध्या भंडारा जिल्ह्यात चार गावांमध्ये जादूटोणा करणी केल्याची प्रकरणे सुरु आहेत. पावसाळ्याची सुरुवात होत असून पावसाळ्यात विविध आजाराची साथ पसरते. यावेळी काही आजार उशीरा बरे होतात.

लोक ढोंगी बाबांकडे जातात याचाच फायदा घेवून ढोंगी बुवाबाबा फसविण्याचे काम करतात. समाजात गावात भांडणे लावतात त्यातून मारामाºया व वेळप्रसंगी खून सुद्धा होतात. अशावेळी प्रशासन अडचणीत येते जिल्ह्याचे नाव बदनाम होते.यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रसार समितीने तात्काळ लक्ष देवून उपाययोजना करावी तसेच समाज जागृती व अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी कार्यक्रम घ्यावे असे निवेदनात नमूद केले आहे? निवेदन देतांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, सामाजिक कार्यकर्ते सुरज परदेशी, नितेश बोरकर,दीपक वाघमारे,प्रा.नरेश आंबिलकर, चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष प्रकाश नाकतोडे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.