नवºयाप्रमाणे ग्राहकांना कन्व्हिन्स करा…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आपल्या नवºयाप्रमाणे बँकेत येणाºया ग्राहकांना कन्वेस’ करा असे लज्जास्पद बोलून महिला कर्मचाºयाला हेतुपुरस्सर मानसिक त्रास दिल्याने बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार भंडारा येथील स्टेट आॅफ इंडियाच्या मिस्कीन टँक शाखेत घडला. राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सुविधा देण्याऐवजी नेहमी मानसिक त्रास देत असल्याची ओरड ग्राहकांकडून सातत्याने होत असते. परंतु या त्रासाचे बळी केवळ बँक ग्राहकच ठरत नसून कनिष्ठ कर्मचारी देखील आहेत, हे भंडारा येथील स्टेट बँकेच्या शाखेत घडलेल्या प्रकारावरून उघडकीस आले. याबँकेत सिनीअर क्लर्क पदावर कार्यरत महिला कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या वाईट नजरेचा शिकार झाली. आरोपी सत्यस्वरुप मेश्राम (४७) रा. आर.बी.ओ. रिझन-५ गोंदिया हा स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर आहे. त्यामुळे तो भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये भेट देत असतो. १३ नोव्हेंबर रोजी भंडारायेथील बँकेच्या मिस्कीन टँकचा शाखेत भेट देऊन संपूर्ण स्टाफची मिटींग घेतली. यावेळी महिला कर्मचाºयाकडे वाईट नजरेने पाहून ‘आपल्या नवºयाला जसे कन्वेंस करता, तसे ग्राहकांना सुध्दा का कन्वेंस करत नाही’ अशा अपमानजनक भाषेत बोलले. यामुळे ग्राहकांसमोर खालच्या भाषेत बोलल्याने महिला कर्मचाºयाला हेतुपूरस्पर वाईट वाटेल अशा प्रकार करण्यात आल्याने याची तक्रारी भंडारा पोलिस ठाण्यात करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सत्यस्वरुप मेश्राम याच्यावर भांदविच्या कलम ५०९ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कराडे हे करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *