जिल्ह्यात गारपीटीसह पावसाची दमदार हजेरी

भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी भंडारा : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवार दि.१८ मार्च व रविवार १९ मार्च रोजी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना वादळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले. या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे. या वादळामुळे भंडारा तालुक्यातील खमारी बु. येथे घरावर झाड कोसळुन जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्यातील तापमानात अनियमित पाहावयास मिळत आहे. गत तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
शनिवार १८ मार्च व रविवार १९ मार्च रोजी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार शहरासह शनिवारी काही भागातच तुरळ पावसाच्या सरी पडल्या. मात्र आज रविवारी दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले व शहारासह जिल्ह्यातील अनेक भागाला वादळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यात गहू, हरभरा,धान, टमाटर पिकांचा समावेश आहे.यामुळे शेतकºयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *