भटक्या गोपाळांपुढे उभे राहणार संकट; पावसामुळे नाल्याचा काठ लागला खचू..

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा: हक्काची जमीन नसल्याने मिळेल तिथे झोपडे थाटून राहणाड्ढया भटक्या समाजबांधवांच्या आयुष्यात चांगले दिवस येत असल्याचे चित्र असले तरी काही ठिकाणी मात्र अजूनही हालअपेष्ठांचे जीवन जगले जात आहे. मोहाडी तालुक्यातील महालगाव येथे मोठया नाल्याच्या काठावर वसलेल्या गोपाळ समाजाच्या घराशेजारील जमीन खचू लागल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊले लवकर उचलली गेली नाही तर पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशावेळी या अनुषंगाने लवकरात लवकर आणि ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. या लोकांचे तात्काळ पुनर्वसन करणयाची मागणी-भटके विमुक्त कल्याणकारी षरिषदेच्या वतीने जिल्हा संयोजक शरद सोनकुसरे व विभाग संयोजक शिवाजी कांबळे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *