अपहरणकर्त्यांना १२ तासांत अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : उधारीच्या पैशातुन झालेल्या अपहरणाचा छडा लावुन अपहरण करणाºया आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत अटक करण्यात भंडारा पोलीसांना यश आले. प्रशांत वहाने रा.व्यंकटेश नगर खात रोड भंडारा असे अपहरण झालेल्या इसमाचे नाव असुन वसीम ऊर्फ मोसीन रहिम खान वय २१ वर्ष रा. खरबी गरीब नवाज चौक रेशिम बाग नागपुर व मंगेश तातोराव सावरकर वय ४१ वर्ष रा. इतवारी मच्छीबाजार, जयभिम चौक नागपुर अशी अपहरणकर्त्यां आरोपींची नावे आहेत. प्रशांत वहाने हे दिनांक १३ मे २०२३ रोजी रात्री उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने कुटूंबियांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला मात्र ते कुठेच मिळुन न आल्याने भंडारा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली. पोलीसांनी युध्दपातळीवर प्रशांत वहाने यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. दरम्यान तांत्रीक पुराव्याचे आधारे प्रशांत वहाने यांचा ४ ते ५ ईसमांनी जबरन अपहरण करुन एका पांढºया रंगाच्या चारचाकी वाहनामध्ये घेवुन गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस स्टेशन भंडारा येथे प्रशांत वहाने यांच्या पत्नी दिपा प्रशांत वहाने यांचे तक्रारीवरुन अप क्र २५९/ २२३ कलम ३६५ भा.द.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता भंडारा पोलीसांनी तपासाचे चक्रे गतीने फीरवुन गुप्त माहितीदार व तांत्रीक पुराव्याचे आधारे आरोपींनी गुन्हयात वापलेल्या वाहनाबाबत शोध घेतला असता गुन्हयातील वाहन हे आरोपी वसीम ऊर्फ मोसीन रहिम खान वय २१ वर्ष रा. खरबी गरीब नवाज चौक रेशिम बाग नागपुर व मंगेश तातोराव सावरकर वय ४१ वर्ष रा. इतवारी मच्छीबाजार, जयभिम चौक नागपुर यांनी वापरली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केली असता आरोपीतांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. पोलीसांनी आरोपांच्या तावडीतुन प्रशांत वहाने यांना सोडविले .

गुन्हयाचा तपास प्राथमिक स्वरुपात असुन आरोपीतांनी अपहत प्रशांत वहाने याचा उधारीचे पैशाचे कारणारणावरुन अपहरण केले असल्याचे समजुन येत आहे. गुन्हयातील ईतर आरोपीचा भंडारा पोलीस शोध घेत आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी , अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , सहा. पोलीस अधीक्षक तुमसर अति. कार्यभार उपविभाग भंडारा श्रीमती रश्मीता राव यांचे मार्गदर्शनात भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष बारसे यांचे नेतृत्वात स.पो.नि सु- शांत पाटील, पो.उप.नि मंगेश क-हाडे, पो. हवा प्रशांत भोंगाडे, पो. हवा साजन वाघमारे, पो.हवा बालाराम वरखडे, पो.ना सुनिल राठोड, पो.शि नरेंन्द्र झलके यांनी केली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *