अगोदरच चार अधिकाºयांचे निलंबन तरीही….. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान्य घोटाळे थांबेना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- तांदूळ नगरी म्हणून नाव लौकिक आलेल्या गोंदिया भंडारा जिल्यात धान्य घोटाळ््यात गेल्या तीन महिन्यात चार जिल्हा पणन अधिकाºयांना निलंबित करण्यात आले असले तरीही भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान्य घोटाळा थांबताना दिसत नसुन भंडारा तालुक्यातील श्री साईनाथ अ‍ॅग्री प्रा.ली. चिखली फाटा येथे शासकीय धान्याची अफरातफर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील दि पांडव सहकारी विपणन भात गिरणी अंतर्गत सुरु असलेल्या शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या काही धान्याची भरडाई करण्याचे आदेश गोंदिया जिल्हा पणन कार्यालयातून चंद्रपूर जिल्याच्या मुल तालुक्यातील हिमालया एग्रो फूड इंडस्ट्री याना देण्यात आले होते .

या साठी जिल्हा पणन अधिकाºयांनी उचल डियो देखील हिमालया एग्रो ला दिला असता. हिमालया एग्रोने दि पांडव सहकारी विपणन भात गिरणी अंतर्गत सुरु असलेल्या नवेझरी गावातील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रातुन १४ मे २०२३ ला ( म्हणजेच काल ) दोन ट्रक धानाची उचल केली यात जवळपास ४० किलो वजनाच्या धानाचे १४०० कट्टे देण्यात आले या साठी हिमालया एग्रो इंडस्ट्रीला मुल याना गोंदिया जिल्हा पणन कार्यलयातून प्रति क्विंटल २०० रुपये दरा प्रमाणे अंदाजे ५६० क्विंटल धानाच्या भरडाई साठी १ लक्ष १२ हजार रुपये इतका वाहतूक भाडा देण्यात आला.मात्र हिमालया एग्रो इंडस्ट्री मूल यांनी स्वत:च फायदा साधून घेण्यासाठी शाशकीय धान्य भंडारा जिल्याच्या जवाहर नगर पोलिश स्टेशनच्या हद्दीत येणाºया चिखली जवळील श्री साई नाथ एग्री इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड याना खोटे बिल तयार करून धान्यांची विक्री केली.

यासाठी लाखनी तालुक्यातील संदीप ट्रान्सपोर्ट यांच्याशी नवेझरी गावातून भंडारा जिल्ह्याच्या चिखली जवळील श्री साई नाथ एग्री इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी हा धान्य पोहचवून देण्यासाठी ट्रांस्पोर्ट व्यवसायिकांशी करार केला असता हा धान्य श्री साई नाथ एग्री इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी ट्रक क्रमांक एमएच४९-ऐटी-९८३५ तसेच एमएच-४९-ऐटी-५०३५ या दोन ट्रक च्या माध्यमातून हे शाशकीय धान्य श्री साई नाथ एग्री इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी पोहचविण्यात आले असता ट्रक क्रमांक एमएच-४९ऐटी-५०३५ हा ट्रक राईस मिल च्या आत नेण्यात आला असून त्या ठिकाणी ट्रक क्रमांक एमएच-४९ऐटी-५०३५ या ट्रक मध्ये असलेल्या अंदाजे ७०० धानाच्या कट्टया पैकी १३८ कट्टे राईस मिलच्या डाल्या मध्ये पालटविण्यात आले तर २१ धानाचे भरलेले कट्टेहे खाली ठेवण्यात आले याची माहिती आमच्या टीमला ला आधीपासून असल्याने आमच्या टीमने नवेझरी गावातील आधारभूत धान्य खरेदी केंद्रापासून या ट्रक वर लक्ष ठेवत भंडारा पोलिसांना या संदर्भात माहिती देत ट्रक ला राईस मिल मध्ये खाली होत असतानाच घेऊन पोलिसांना सोबत घेऊन जात श्री साई नाथ एग्री इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड च्या मालकांना विचारणा केली असता हे धान्य आम्ही एका खाजगी व्यवसायिकांकडून विकत घेतल्याची माहिती राईस मिल मालकाने पोलिसांना दिली मात्र शासकीय धान्य तुम्ही कसे काय विकत घेतले याच जाब राईस मिल मालकाला विचारला असता समाधान कारक उत्तर न मिळाल्याने ट्रक क्रमांक एमएच-४९-ऐटी-५०३५ या ट्रक मधील धानाचे पोते जपत करून मिल बाहेर उभा असेलला ट्रक देखील पोलिसांनी जप्त करीत दोन्ही ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून या संदर्भात चौकशी सुरु आहे.

तर गोंदिया च्या नवेझरी धान्य खरेदी केंद्रातून हा धान्य नेण्यात आला होता काय याची चौकशी गोंदिया जिल्हा पणन अधिकारी करीत आहेत गोंदिया भंडारा जिल्यात तसेच पूर्व विदर्भात उत्पादित झालेला धान्य हा इतर राज्याच्या तुलनेत चांगल्या दर्जाचा असल्याने या धन्या पासून खाजगी राईस मिलर्स चांगल्या दर्जाचा तांदूळ तयार करून इतर देशात तसेच इतर जिल्यात जास्त दराने विक्री करतात त्यामुळे गोंदिया भंडारा जिल्या शह इतर जिल्यातील राईस मिल मालकाना भरडाई करण्याकरिता मिळालेला धान्य येथील राईस मिलर्स बाजूला लागून असलेल्या नागपूर जिल्याशह छत्तीसगगढ राज्यात येथील धनाची विक्री करून उत्तरप्रदेश राज्यात उत्पादित झालेल्या हलक्या दर्जाच्या धानापासून तयार करण्यात आलेला तांदूळ खरेदी करून सी एम आर च्या नावावर शाशकीय तांदूळ गोदामात जमा करून जास्त नफा कमवितात त्यामुळे तांदूळ .गोदामांची कसून चौकशी केल्यास धान्य घोटाड्या सह पुन्हा तांदूळ घोटाळा उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

जिल्ह्यात धान घोटाळा किंवा धान्य घोटाळा हे काही नवीन नाही.शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी केला जाणारा शेतकºयांचा धान असो किंवा शासनातर्फे भरडाई करण्यात येणारे धान्य असो दोन्ही प्रक्रिया नेहमीच भ्रष्टाचाराच्या कचाट्त्या सापडली आहेत.सध्या जिल्ह्यात धान्य भरडाई करण्याच्या नावाखाली मोठा गोंधळ वजा गैरप्रकार जिल्ह्यात सुरू आहे.धान्य भरडाईच्या नावाखाली राईस मिलर्स कडुन उचल केल्या जाणाºया धानाचा धान्याच्या रूपात शासनाला परतावा करतांना किती व कोणत्या प्रकारचे धान्य परत केले जाते याबद्द न बोललेलेच बरे.धान्याची भरडाई करणाºया जिल्ह्यातील राईस मिलर्सची चौकशी झाल्यास अनेक मोठे घबाड समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.मात्र एवढी हिंमत कोण करणार? हा येथे मोठा प्रश्न आहे.असे झाल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.

जवाहरनगर पोलीसांना त्यांच्या गुप्तहेरांकडुन ,गोंदिया जिल्ह्यातील नवेझरी इथुन शासकीय धान्य असलेले दोन ट्रक चिखली फाटा परिसरातील साईनाथ अ‍ॅग्री प्रा.लि. मिलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलीसांनी दोन पंचासह सदर ठिकाणी छापा मारला असता एक ट्रक गेटच्या आतमध्ये तर दुसरा ट्रक गेटबाहेर उभा होता.ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये शासकीय धान्याचे पोते आढळुन आले.दरम्यान एका ट्रकचा चालक फरार झाला होता तर दुसरा ट्रक च्या चालकाला सदर धान्याविषयी विचारले असता तो समाधानकारक उत्तर देवु शकला नाही.सदर मिल मधील व्यक्तीला ट्रकमधील धान्याविषयी विचारणा केली असता तोसुध्दा योग्य उत्तर देवु शकला नाही त्यामुळे दोन्ही ट्रक मालासह जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.सदर धान्याविषयी अधिक माहिती जाणुन घेण्याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तहसीलदार यांना पत्रव्यवहार करण्यात आला असुन त्यांचे उत्तर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. श्री.बोरकुटे ठाणेदार,जवाहर नगर पोलीस स्टेशन

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *