गायमुख देवस्थानात संत भूराभगतांच्या मुर्तीचे अनावरण

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : भंडारा जिल्ह्यातील प्रख्यात गायमुख देवस्थान येथे गुरुवारी श्री शंकर भगवान यांचे परम भक्त श्री संत भूराभगत यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी श्री संत भुराभगत महाराज्यांच्या मुर्तीचे स्थापक दिलीप भुरे तुमसर, यांनी मुर्ती अनावरण कार्यक्रमा प्रसंगी सर्व भावी भक्तानां आमंत्रित केले होते. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार राजू कारेमोरे, पवन चौहान, किरण अतकरी, सुभाष भाजीपाले प्रामुख्याने उपस्थित होते. मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा प्रसंगी सर्वप्रथम श्री संत भुराभगत मुर्तीचे स्थापक दिलीप भूरे यांनी आ. राजू कारेमोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला. मुर्ती अनावरण प्रसंगी आ.राजू माहिती देत पुढे म्हणाले की, श्री भूरा भगत एकदा ध्यानात इतके तल्लीन झाले की दूसरे दिवशी त्यांची समाधी तुटली. त्या दिवसा नंतर घरदार सोडून देवाच्या भक्तिसाठी तपश्चार्य करण्यासाठी पर्वतावर गेले. नंतर तपश्चर्या करुन त्यांनी भोलेनाथांना प्रसन्न केले आणि भोलेनाथांनी त्यांना वरदान दिले की, जिथे जिथे माझे मंदिर राहिल त्या त्या ठिकाणी तुझी पण मूर्ति राहील आणि तू सदैव लोकांना मार्गदर्शन करत राहशील अशी त्यांच्या जीवना विषयी आमदारांनी रितसर माहिती दिली. सर्वप्रथम आ.राजू कारेमोरे यांच्या हस्ते श्री संत भुराभगत महाराजांचा मूर्तिला पंचामृतानी जलाभिषेक करून मूर्तिची पूजा अर्चना केली. मूर्ति प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाकरिता आलेले सर्व शिव भक्तांमधे प्रसाद वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळावा म्हणून कार्यक्रममध्ये सहभागी होण्याकरिता प्रकाश मडावी, कैलास उईके, राजहंस कटरे, मंडयाल चांदेवार, धनराज भलावी, सुभाष धुर्वे, देवीलाल पटले, रामू कामरकर, भैया पटले, अभय इलमे, महिला भक्तीने मधून यशोदा कवरे, जयवंता भुरे, रीता भुरे, निर्मला चाचिरे, साईश्री भुरे, साई भुरे उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या शेवट आभार प्रदर्शन म्हणून कार्यक्रमाचे व्यवस्थापक सुजय भुरे यांनी आलेले प्रमूख पाहुण्यांचा व आलेले सर्व भाविक शिव भक्तांचा सहकार्य करण्याकरीता आभार मानले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व भक्त गण सहभागी झाले असून कार्यक्रम उत्तम रितीने पार पडला. कारेमोरे यांनी श्री संत भूराभगत यांचा जीवना विषयी सांगितले की, भारतातील प्रत्येक समाजात अनेक सिद्ध आणि प्रसिद्ध संत आहेत त्यापैकी एक संत श्री भूराभगत महाराज असून यांचा जन्म नागवंशी कुटुंबात १६ व्या शतकात भक्तिकाळात झाला. यांना कटिया समाजाचे कुलदैवत मानले जाते. गोंड समाज आणि आदिवासी समाजातील लोकही यांना आपला प्रसिद्ध संत मानतात. भुराभगत महाराजांची जयंती वैशाख शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरी केली जाते. यांच्या जीवनाविषयी रोचक

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.