तंटामुक्त अध्यक्षपदी धर्मराज टांगले यांची निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सुरेवाडा येथे झालेल्या महात्मा गांधी गाव तंटा मुक्त अध्यक्ष पदी धर्मराज टांगले यांची निवड करण्यात आली. दि.१३ फेब्रुवारी रोजी सुरेवाडा येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच दिक्षा सुखदेवे यांच्या अध्यक्षतेखाली गाव तंटा मुक्त समिती निवडी बाबत ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये समिती गठीत होऊन अध्यक्ष पदाकरिता बहुमताने धर्मराज टांगले यांची नियुक्ती करण्यात आली. कोणताही भेदभाव न करता गावातील तंटे गावातचमिटविण्याचे आश्वासन टांगले यांनी दिले. याकरिता गावकºयांनी समितीला सहकार्य करावं अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

या निवडीबद्दल सरपंच दिक्षा सुखदेवे, उपसरपंच दुर्योधन राघोर्ते, सदस्य पल्लवी सुखदेवे, रेखा अंबाघरे, सुरेखा राघोर्ते, छाया गोटेफोडे, नाना हजारे, महादेव राघोर्ते, पंकज सुखदेवे, जगदीश सुखदेवे, रुमराज सुखदेवे, तुकाराम हजारे, बंडू भुते, केवळ नागपुरे, सेवक सुखदेवे, कुशन मडामे, मनोहर उके, राजू खोब्रागडे, अंकुर सुखदेवे, झिबल राघोर्ते, अतुल राघोर्ते, अभिमन उके, रामू हजारे, रामप्रसाद ढेंगे, पांडुरंग जमजारे तसेच मुकेश सुखदेवे आदींनी शुभेच्छा दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *