ट्रेलरच्या धडकेत बजरंग दल कार्यकर्ता ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दुचाकीने स्वगावी जात असलेल्या बजरंग दल कार्यकर्त्याला भरधाव ट्रेलरने धडक देऊन ठार केल्याची घटना अड्याळ बसस्थानकासमोर घडली. मनीषकुमार पांडे (वय ३४) रा. नानक वॉर्ड शांतीनगर भंडारा असे मृतकाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी रस्तारोको आंदोलन करून वाहतूक अडवून धरली होती. मनीषकुमार हा शनिवार २५ नोव्हेंबर रोजी दुचाकी क्र. (एमएच ३५ एके ३६६८) ने भंडाराहून पवनीकडे जात होता. दरम्यान अड्याळ येथील नादुरूस्त रस्त्यावर मागेहून येणाºया ट्रेलरची त्याला कट लागल्याने तो खाली पडला. यावेळी ट्रेलरचा मागील चाकाखाली आल्याने मनिषकुमार गंभीर जखमी झाला. परिसरातील लोकांनी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी ट्रेलर क्रमांक एमएच ४० सीएम ५७५७ च्या चालकाविरूध्द भादंवि चे कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४, १३४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कित्येक वर्षापासून भंडारा-पवनी रस्त्याचे काम सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यातच अड्याळ येथे ठिकठिकाणी रस्त्याचे कामअर्धवट सोडण्यात आले आहे. यावरील रस्त्याच्या मधोमध असलेल्या मोठमोठ्या खड्डावरून रस्ता अतिशय खराब असल्याने तेथे अनेकांचे अपघात झाले आहेत. याच ठिकाणी मनिषकुमार पांडे यांचाही बळी गेल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या अपघातानंतर रस्ता अडवून धरला होता. यामुळे वातावरण तापल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार व राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महिनाभरात गावातून महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *