शेतक-यांना उत्पन्नाची संधी देणाºया महावितरणच्या योजनेचा लाभ घ्यावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपुर : कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणारी जमिन प्रतिवर्ष ७५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने महावितरणद्वारे भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. शेतकºयांना उत्पन्नाची संधी देणाºया महावितरणच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे. रामटेक तालुक्यातील नगरधन ग्रामपंचायत मध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी हे आवाहन केले. यावेळी त्यांनी या योजनेचा आढावा घेतला व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत निर्देश दिले.
तसेच महावितरणच्या सौर योजनेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नगरधनच्या सरपंच मायाबाई दमाहे, उपविभागीय अधिकारी वंदना विराणी, तहसिलदार बाबासाहेब मस्के, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता आशिष तेजे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन नगरधन ग्रामपंचायतीचे सचिव नारायण कुंभलकर यांनी केले. राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषि वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे, अशा वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता महावितरणच्या नागपूर जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रापासून ५ किलोमीटर पर्यंतच्या तसेच रस्त्यालगतच्या जमिनीची महावितरणला गरज आहे. या योजनेअंतर्गत लागणारी खाजगी जमीन महावितरणला भाडेपट्टयाने उपलब्ध करुन देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किंमतीच्या ६ टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्रति वर्ष ७५ हजार रुपये प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्यादराने वार्षिक भाडेपट्टयाचा दर निश्चित करण्यात आलेला आहे.
प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर प्रत्येकी वर्षी ३ टक्के सरळ पध्दतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येईल. या योजनेत सहभागी होऊन आपली जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी शेतकºयांनी ६६६.ेंँं्िर२ूङ्मे. ्रल्ल/’ंल्ल_िुंल्ल‘_स्रङ्म१३ं’/्रल्लीि७_े१.स्रँ स्र. या संकेतस्थळावर अर्ज करावा, तसेच नागपूर जिल्ह्यातील माहिती बाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रोहन कºहाडे (मो. ७८७५५००९१७) किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.