गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांची मध्यप्रदेशला विलीन करण्यासाठी आक्रोश बैलबंडी मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी आमगाव : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपुर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही आठ गाव गोंदिया जिल्हा तील महाराष्ट्र राज्यात असून त्यांचे विलीनीकरण राज्य सीमावर्ती मध्यप्रदेश राज्यात करण्यात यावे अश्या मागण्या घेऊन, आज या आठ ही गावातील लोकांनी बैलबंडी मोर्चा काढत हजारोच्या संख्येने गावकरी या मोर्च्यात सहभागी झाले असुन तहसील कार्यलावर धडक मोर्चा काढत तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. सदर या आठ ही गावातील लोकसंख्या जवळपास ४० हजार असून त्यांचे राज्य सीमावर्ती भाग हा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. मागील आठ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने नगर पंचायत ते नगरपरिषद स्थापनेचा वाद निर्माण करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवले आहे. त्या मुळे या गावांचाविकास होत नसून मागील आठ वर्षा पासून या गावाचा विकास रखडला आहे. त्या मुळे या आठ गावांना मध्ये प्रदेश येथे विलीनीकरण करण्यात यावे असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
सदर न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे राज्य सरकारने प्रशासकावर कारभार सुरू ठेवला आहे. यामुळे प्रलंबित न्यायप्रविष्ट असल्याने सन २०१४ नंतर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. लोकप्रतिनिधी निवडणूक झाली, नसल्याने व योजना विकास निधी मंजूर करण्यात आले नाही, त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. सदर भागाचा भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने मागील १३ वर्षांपासून या ठिकाणी राज्य व केंद्र सरकारच्या योजना बंद करून नागरिकांना मूलभूत विकासा पासून रोखले आहे. सदर आठ गावांना मध्यप्रदेश राज्यात विलीनीकरण करून राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करून विकास कराव अशी मागणी नगर परिषद संघर्ष समितीने यावेळी करण्यात आली आहे. या आठ गावातील लोकांना घरकुल मिळावे तसेच शौचालय मिळावे तसेच इतर हि लाभ मिळावे यासाठी अनेकदा निवेदन दिले, मात्र या योजने पासून या गावकºयांना वंचित राहावे लागत आहे. त्या साठी राज्य शासनाचा लक्ष आपल्या मोर्च्याकडे पडावा यासाठी बैलबंडी मोर्चा काढत बैलबंडी वर घरकुल व शौचालय तयार करत मोर्चा काढला वआपल्या मागण्या घेऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन दिले.
मोर्चाचे मार्गदर्शन रवी क्षीरसागर, यशवंत मानकर, संजय बहेकार, उत्तम नंदेंस्वर, जगदीश शर्मा यांनी केले. मोर्चाचे प्रतिनिधित्व रवी क्षीरसागर, यशवंत मानकर, संजय बहेकार, उत्तम नंदेंस्वर, रामेश्वर श्यामकुवर, रमन डेकाटे, मुन्ना गवली, रितेश चुटे, राजकुमार फुंडे, राजेश मेश्राम, महेश उके, अजय खेताण, व्ही.डी. मेश्राम, कामलबापू बहेकार, दिलीप टेमभरे, जगदीश चुटे, अबुले, रामदास गायधने, घनश्याम मेंढे, रामकीशन शिवणकर, अशोक बोरकर, पिंकेश शेंडे, महादेव हटवार, प्रदीप कोटांगले, राजेश मेश्राम, राजेश सातनूरकर, प्रमोद शिवणकर, भोला गुप्ता, बिसराम मेश्राम, संतोष पुंडकर, राजीव फुंडे, अनिल पाऊळझगडे, ममता पाऊळझगडे, सुनंदा येरणे, प्रभाताई उपराडे, अरुणा बहेकार, छबु ताई उके, जयश्री पुंडकर, पुष्पलता केशरवाणी, शारदा मेश्राम, कविता मेश्राम, अर्चना पवार, राधाकिशन चुटे, सुनीता पंधरे आदी आठ गावचे नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *