खैर प्रजातीचे पाच लाखांचे लाकूड जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत रात्री दरम्यानच्या गस्तीवर असतांना खैर प्रजातीचे लाकडांची तस्करी करणाºया वाहनासह दोघांना अटक करण्यात आली. लाकडांची किंमत अंदाजे ५ लाख रुपये आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री केली. तिरोडा पोलिस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीदरम्यान गस्तीदरम्यान दवनीवाडा पोलिस ठाणे हद्दीत परसवाडा येथे नाकाबंदी केली. यावेळी मध्यप्रदेशातील खैरलांजी कडून तिरोडा मार्गे नागपूरकडे जाणाºया एका पिकअप वाहनात (एमएच.३०.एल ४८८५) लाकूड आढळून आले. पोलिसांनी वाहन चालक विधीसंघर्ष बालक व वाहनात बसलेल्या रतनलाल सुरजलाल पटले याला लाकडांसदर्भात चौकशी केली असता त्यांच्याजवळ कोणतेही कागदपत्र नव्हते. मात्र त्यांनी सदर लाकडे हे विक्रीकरीता सिहोरा येथे नेत असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिसांनी वाहनातील खैर प्रजातीचे अंदाजे ३ ते ४ फुट लांबीचे ५० ते ६० सें.मी. व्यास असलेले अंदाजे १५० नग लाकूड व वाहन जप्त करुन विधीसंघर्ष बालक व रतनलाल पटले याला ताब्यात घेतले. जप्त केलेले लाकूड तिरोडा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरीष्ठाच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विघ्ने, पोहवा ठाकरे, तुरकर, पटले यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.