चार वर्षांत गोंदिया जिल्ह्याला मिळाले पाच पालकमंत्री

प्रतिनिधी गोंदिया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (दि.४) ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची निवड केली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्याला मागील चार वर्षांच्या काळात पाच पालकमंत्री मिळाले आहे. पुन्हा जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री दिल्याने जिल्ह्यावासीयांमध्ये नाराजीचा सुर आहे.

स्थानिक पालकमंत्र्यांच्या बाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर, राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत चार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाचवे पालकमंत्री मिळाले. महादेवराव शिवणकर राज्याचे मंत्री असताना १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवणकर यांनी प्रभावशाली भूमिका बजावली होती. त्यानंतरच्या काळात मात्र जिल्ह्यावर कायमच बाहेरचे पालकमंत्री लादण्यात आले. या पूर्वीचे पालकमंत्री तर वर्षातून फक्त झेंडावंदन करण्याकरिताच येत होते. त्यामुळे त्यांना ‘झेंडामंत्री’ असे नामाकरणसुद्धा करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर युतीच्या काळात जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेले राजकुमार बडोले यांनी शेवटच्या सहा महिन्यांत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. युती सरकारच्या काळात भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. पहिले पालकमंत्री महादेवराव शिवणकर हे होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *