स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी कर्मचाºयांचा जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार

भंडारा : पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी सहायक शिक्षीका मंजुषा नंदेश्वर,बाळासाहेब मुंडे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी कर्तव्य सपाटे यालाही सन्मानित करण्यात आले.

रानभाजी महोत्सव पाककला स्पधेर्तील यामध्ये प्रथम क्रमांक पुष्पा नागोसे, तर मंगला डहाके, नगीना बनसोड यांनाही सन्मानित करण्यात आले. शहीद नायक चंद्रशेखर भोंडे हे कर्तव्यावर असतांना शहीद झाले. त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश म्हणून त्यांच्या पत्नी व माता पित्यांना ६० लाखाचे धनादेश, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ताम्रपट देऊन कुंटुबियांचा सन्मान करण्यात आला.तर जम्मू कश्मीर मध्ये कर्तव्यावर असताना अपंगत्व आलेले नायक सागर खंडाईत यांच्या कुटुंबियांना ही ६० लाखाचे धनादेश, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ताम्रपट देऊन कुंटुबियांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त २६ जुलै रोजी कारगील विजय दिवसानिमीत्त वृक्षारोपणात प्रथम क्रमांक आलेल्या पूर्व सैनिक बहुद्देशीय संस्था, ठाणा व माजी सैनिक बहुद्देशीय संस्था, पवनी यांना अनुक्रमे २० हजार व १० हजाराचे धनादेश देण्यात आले. तसेच आवास योजनेतील उत्कृष्ट काम करणाºया तालुक्यांना ही सन्मानित करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.