२८ रोजी नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खा. पटेल यांच्या हस्ते शुभारंभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : येत्या २८ नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२ वाजता लाखांदूर, जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकºयांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकºयांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकºयांना फायदा होणार असून, शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी,व परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणारे नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम साखर कारखाना परिसर, लाखांदूर येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, नानाभाऊ पंचबुद्धे, सुनील फुंडे, विनोद ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *