पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पाचगावकरिता निवड

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : केंद्र सरकार संचालित जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा आॅनलाइन निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात दरवर्षी ग्रामीण भागातून साठ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामध्ये जि.प. डिजिटल पब्लिक स्कुल खराशी शाळेतील इयत्ता पाचवीतील पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पाचगाव करिता निवड झालेली आहे. यात कार्तिकेय वसंता डेकाटे,राज कैलास भेलावे, कु.श्रेया शेषराज सिंगनजुडे, कु.सुहाना सुभाष चवळे, कु.ओजस्वी दिगंबर फुंडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देत शाळेचे शिक्षकवृदानी सन्मानित केले. खराशी येथील जिल्हा परिषदेची शाळा स्पर्धा परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात आहे. तसेच येथील कार्यरत शिक्षकांचा सुद्धा त्यांचा विषयांत असलेला हातखंडा ही या शाळेची विशेष बाब आहे. दिवसेंदिवस शिक्षणात मोठी स्पर्धा वाढलेली आहे. शहरासह ग्रामीण भागातही शिक्षणाची गोडी लावण्याचा काम खराशी शाळा करताना लक्षात येते. स्पर्धेच्या युगात धावणारा विद्यार्थी पुढे पुढे सरकत जातो.

त्यादृष्टीने ग्रामीण शिक्षण क्षेत्रातसुद्धा विद्यार्थी व शिक्षक तसेच पालकसुद्धा मेहनत घेत आहेत, जि.प. खराशी शाळेतील नवोदय परीक्षा मार्गदर्शक वनिता खराबे तथा सतीश चिंधालोरे या होतकरू शिक्षकांनी घेतलेली मेहनत फळाला आली. तत्कालीन मुख्याध्यापक मुबारक सैय्यद यांचे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आखलेले तंतोतंत नियोजन विद्याथ्यांचे शैक्षणिक करण्याकरिता महत्त्वपूर्ण ठरले. नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी वनिता खराबे यांनी वर्षभर विशेष सराव करवून घेतला तर शिक्षक सतीश चिंधालोरे यांच्या या नवोपक्रमामुळे परीक्षेत विचारले जाणारे कठीण प्रश्न अगदी सेकंदात कसे सोडवायचे? हे विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरले. तसेच नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी शाळेतील शिक्षक योगीराजदेशपांडे, सुनील भरणे, मोनिका झलके यांनी विशेष सहकार्य केले. शिक्षकांबरोबरच पालकांचे सुद्धा पाल्याप्रति केलेले प्रयत्न सफल झाले. पाल्यांच्या या यशाबद्दल शाळेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे पेढे भरवून व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले.

रात्री ७ वाजताचा आॅनलाईन क्लाससुद्धा फायदेशीर

नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी शाळेत आॅफलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. परंतु शाळेत मिळालेल्या वेळेत अपुरे मार्गदर्शन होत असल्याने मोहाडी येथील सतीश रमेश चिंधालोरे यांनी चॅनेलद्वारे दररोज एक तास सायं. ७ वाजता आॅनलाईन क्लास घेणे सुरू केले. त्यात संपूर्ण विषयांचे वर्षभर मार्गदर्शन आणि सराव करवून घेतले. त्याचा विद्यार्थ्यांना भरपूर उपयोग झाला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *