संततधार पावसाने अर्जुनी मोर तालुक्यात पुर सदृश्य स्थिती

बोंडगावदेवी : अर्जुनी मोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शेत जलमग्न झाल्याने भात नर्सºया कुजण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार तर नाही ना? अशी शंका शेतकºयांत निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यासह अर्जुनी मोरगाव तालुक्यात गत तिन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तालुक्यासह बोंडगावदेवी परिसरात गावागावात मामा तलाव, नवेगावबांध जलाशय इटियाडोह धरण यामुळे तालुक्यात उन्हाळी धान पीक घेतले जाते. यामुळे जमीन ओली असल्याने पाणी लवकर साचतो. होईल तेवढ्या लवकर शेतकरी खरीप धान पिकाची पेरणी आटपून घेतात. तालुक्यात सुमारे ७० टक्के धान नर्सरी टाकून झाल्यात. गत तिन दिवसांपासून सूरू असलेल्या संततधार पावसाने शेतातील धान नर्सºया पाण्याखाली आहेत.

पावसाने उसंत न घेतल्यास दुबार पेरणी करावी लागणार का? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तालुक्यात मंगळवारी १४३.२८ मिमी पावसाची नोंद झाली. आज बुधवारीही ५३.८ मिमी पाऊस नोंदला गेला. सततच्या पावसामुळे परिसर जलमय झाला आहे. तळ गाठलेले तलाव, नाले, ओढे, नद्या ओसंडून वाहत आहेत. काही गावांत शेतकºयांच्या गोठे, कौलारू घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. चान्ना गावातील जानकूबाई भगवानजी राखडे यांचे २६ जूनला निधन झाले. २७ जून रोजी अंत्यविधी कार्यक्रम होता. अतिवृष्टीमुळे त्यांच्यावर अग्नीसंस्कार करता आला नाही. वेळीच त्यांच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला. हे विशेष!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *