बागेश्वर महाराज यांचा पवनी शहर व तालुक्यातील सेवकांतर्फे जाहीर निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : बागेश्वर धामचे तथाकथीत महाराज यांनी मानव धमार्चे संस्थापक “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांच्या बद्दल, त्यांच्या कार्य बद्दल तसेच त्यांचे विचार मानणारे सेवकांबदल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या बद्दल पवनी शहर व तालुक्यातील परमात्मा एक सेवकांनी पोलिस स्टेशन पवनी येथे जाहीर निषेध व्यक्त करीत कार्यवाहीची मागणी केलेली आहे. चंदुबाबा स्टेडियम, माडगी, तालुका मोहाडी,जिल्हा – भंडारा येथे धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असून बागेश्वर धाम, छत्तरपुर, मध्यप्रदेशचे तथाकथित महाराज धिरेंद्र शास्त्री यांनी दिनांक २९ मार्च २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या प्रवचनात मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर, त्यांच्या कार्यावर तसेच त्यांना मानणाºया अनुयायांवर (सेवक) आक्षेपार्ह वक्तव्य व प्रवचनाच्या माध्यमातून अपप्रचार करीत असल्याने मानवधर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेव पोहचवून भावना दुखावलेल्या आहेत.

यामुळे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जूमदेवजी यांना मानणारा सेवक वर्ग संतापलेला असून बागेश्वर महाराज ( धिरेंद्र शास्त्री ) यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पवनी शहरातील व तालुक्यातील सेवक यांचे तर्फे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन पवनी यांना देण्यात आले. निवेदन देताना कोठीराम मुंडले, देवचंद पाटील,भोजराज लांजेवार, देवराज बावनकर,श्रीराम बावनकर, घनश्याम उरकुडकर,शेषराव वैद्य, दिनेश काटेखाये,चेतन बावनकर, दुधराम मेश्राम,मनोहर मेश्राम, हिवराज जिभकाटे,धनराजरासेकर, जयेश वैद्य, सुबोध काटेखाये,श्रावण देशमुख, वामन कटरा, यशवंत डहारे, अरविंद तांडेकर,लाला सावरबांधे, दीपक भुरे, श्रीकांत तुळसकर,विजय निंबेकर, योगेश बावनकर,राहुल नंदनवार, अनंत शेंडे, शैलेश बावणे, नितेश शेंडे,अंकित तिघरे, आकाश दुर्गे, अमोल चिलबुले, शरद दलाल, प्रशांत थेरे, अविनाश हेमने तसेच शहर व तालुक्यातील सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.