वादग्रस्त वक्तव्य करणाºया बाबा बागेश्वर यांना अटक करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: बागेश्वर धामचे तथाकथीत महाराज यांनी मानव धमार्चे संस्थापक “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांच्या बद्दल, त्यांच्या कार्य बद्दल तसेच त्यांचे विचार मानणारे सेवकांबदल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या बद्दल भंडारा तालुक्यातील परमात्मा एक सेवकांनी पोलिस स्टेशन भंडारा येथे जाहीर निषेध व्यक्त करीत कार्यवाहीची मागणी केलेली आहे. चंदुबाबा स्टेडियम, माडगी,तालुका – मोहाडी,जिल्हा भंडारा येथे धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असून बागेश्वर धाम, छत्तरपुर, मध्यप्रदेशचे तथाकथित महाराज धिरेंद्र शास्त्री यांनी दिनांक २९ मार्च २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या प्रवचनात मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर, त्यांच्या कार्यावर तसेच त्यांना मानणाºया अनुयायांवर (सेवक) आक्षेपार्ह वक्तव्य व प्रवचनाच्या माध्यमातून अपप्रचार करीत असल्याने मानवधर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोहचवून भावना दुखावलेल्या आहेत. यामुळे मानव धमार्चे संस्थापक महानत्यागी बाबा जूमदेवजी यांना मानणारा सेवक वर्ग संतापलेला असून बागेश्र्वर महाराज ( धिरेंद्र शास्त्री ) यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भंडारा तालुक्यातील सेवक यांच्यातर्फे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन भंडारा यांना देण्यात आले. निवेदन देताना अजय मेश्राम, पवन मस्के, गोवर्धन निनावे, नितेश मारवाडे, प्रमोद केसलकर, प्रवीण मेहर, बालू भाऊ ठवकर, जितेंद्र सार्वे, ब्रह्मदास बागडे, स्वप्नील कोसरे, गणेश टिचकुले, पंकज भोंगाडे, भावेश नागपुरे, सुमित बोरकर, अविनाश फंदे, राहुल बोंद्रे, संजय चोपकर, अनुप हटवार, मारुती चेटूले व इत्यादी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *