वारकºयांवर लाठीचार्ज काळीमा फासणारी घटना – जयश्री बोरकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीतील वारकºयांवर आळंदी येथे पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी असून याचा निषेध म्हणून सोमवारी भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आळंदी येथे वारकºयांकडून संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी नेण्यात आली होती. या दिंडीतील वारकºयांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. महाराष्ट राज्याला हजारो वर्षांपुवीर्ची वारीची सुसंस्कृत अशी परंपरा आहे.

ती परंपरा अबाधित ठेवण्याच्या ऐवजी नासवण्याचे काम राज्य सरकारने केल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. सहिष्णू म्हणून ओळखल्या जाणाºया वारकरी संप्रदायावर केलेल्या या कृत्याचा महिला काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर निषेध नोंदवित झालेल्या घटनेचा चौकशी करण्याचीमागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देतेवेळी जयश्री बोरकर, जि.प. सभापती स्वाती वाघाये, स्वाती हेडाऊ, नम्रता बागडे, रिना हटवार, नरेंद्र साकुरे, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, भाऊ कातोरे, इंटक जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, संगीता गोमासे, विनीत देशपांडे, लखन चवरे, गीतांजली घरडे, शेख नवाब, कांचन काटेखाये, सोनू कोटवानी, श्रीकांत येरपुडे, स्नेहा भोवते, महेंद्र वाहने, सारिका नागदेवे, भावना शेंडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *