निलज-कारधा रस्त्याचे बांधकाम तात्काळ पुर्ण करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : निलज-कारधा रस्त्याचे उर्वरित बांधकाम तात्काळ पुर्ण करण्यात यावे तसेच झालेल्या रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील निलज- कारधा महामार्गाचे बांधकाम दोन वर्षात पुर्ण करणे अपेक्षीत असतांना सात वर्ष लोटुनसुध्दा या रस्त्याचे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तर करण्यात आलेले बांधकामसुध्दा निकृष्ट दर्जाचे असुन रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.
या मार्गावरील रस्त्याची जंगलव्याप्त भागातुन सात वर्षापासून डागडुजी न झाल्याने अनेक प्रवाशांचे अपघात होवुन अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. ना. नितीन गडकरी हे रस्ते बांधण्यासाठी प्रसिद्ध असले तरी कारधा निलज महामागार्चे काम पुर्ण करण्यात पुर्ण त: अपयशी ठरले आहेत.करीता कंपनीने केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करुन उर्ररीत काम तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा १० एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्ग कार्यालय भंडारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देतांना सुभाष आजबले, पुजा ठवकर,निखिल ईलमे, प्रविन उदापूरे, स्वप्नील आरीकर सतीश सार्वे,अभय डोंगरे, राधे भोंगाडे,गजानन मेहर, पराग वघरे,गिरीश ठवकर, विनोद निबार्ते आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *