जुनी टाकळी येथे मोठ्या प्रमाणात रेती चोरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जुनी टाकळी येथील वैनगंगा आणि सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे.पोलीस आणि महसूल विभागाच्या समोरच दररोज शंभर ट्रॅक्टर रेती चोरी केली जाते.या परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या रेती चोरीवर पायबंद घालावा अशी मागणी केली आहे. भंडारा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर जुनी टाकळी हे गाव असून या गावातून वैनगंगा नदी वाहते बाजूलाच सूर नदीचेही पात्र आहे.या नदी पात्रातून दररोजशंभर पेक्षा जास्त ट्रॅक्टर व ट्रक रेती चोरी होते. रेती चोरी होऊ नये म्हणून दाभा गावाजवळ सूर नदीच्या काठावर वरठी पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस चौकी लावण्यात आली आहे.सोबत तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचाºयाची ड्युटी लावण्यात आली आहे.
मात्र त्यांच्या उपस्थितीत दररोज शंभरपेक्षा जास्त ट्रॅक्टर ट्रक रेती चोरी होत आहे. याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही.रेतीच्या ट्रक व ट्रक्टरमुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. टाकळी खमाटा येथील नदीघाटातून होणारी रेती चोरी बंद करण्यात यावी. होणारे अपघात टाळण्यात यावे तसेच पोलीस अधिकारी व तलाठी यांच्या कारवाई व्हावी यासाठी दिनांक १८ एप्रिलला नवीन गावठाण पुनर्वसन कोथुर्णा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाºयाच्या वतीने अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, कोठीराम पवनकर, योगेश गायधने, मोहन गायधने,आकाश रामटेके यांनी भंडाºयाचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *