बाजारात सीताफळाची मोठ्या प्रमाणात विक्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सर्वसामान्यांचा गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची बाजारात आवक मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. बाजारात ठिकठिकाणी सीताफळांची दुकाने लागल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे विजयादशमी संपताच सीताफळांची बाजारात आवक सुरू होते. रामायण या पवित्र ग्रंथात वनवासात असताना प्रभू श्रीरामाने सीतेला सीताफळ आणून दिल्याचा संदर्भ आहे. सध्या विविध ठिकाणी मोठया प्रमाणात सीताफळ विक्रेते बसलेले दिसून येतात. परंतु, दर आवाक्यात नसल्याने सामान्य ग्राहकांना त्यांचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. सीताफळांचे दर महाग असले तरी, हंगामी व पौष्टिक फळ म्हणून आवडीने खाल्ले जाते. त्यामुळे ग्राहकांची सीताफळांना विशेष मागणीअसल्याची फळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दसºयाच्या दरम्यान सीताफळ समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गरिबांचा ग्रामीण सुकामेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची आवक गेल्या पंधरवड्यापूर्वीच चिमूरच्या बाजारात सुरू झाली आहे. दसºयाचा दरम्यान सीताफळ बाजारात येतात. परंतु, यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गरिबांचा ग्रामीण सुकामेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची आवक गेल्या पंधरवड्यापूर्वीच बाजारात सुरू झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *