भंडाºयाजवळ मालगाडीची कपलिंग तुटली

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : दक्षिण, पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मालगाडीच्या वॅगनला जोडणारी कपलिंग तुटली. भंडाराजवळ रविवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली. भंडारा- खात रेल्वे स्थानकादरम्यान धावणाºया मालगाडीच्या दोन वॅगनदरम्यानची कपलिंग अचानक तुटली. चालकाच्या ते लक्षात आल्यानंतर लगेच मालगाडी थांबवण्यात आली. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर तातडीने मदत चमू पाठवण्यात आली. दरम्यान, तोपर्यंत या मार्गावर धावणाºया मालदा टाऊन सूरत एक्सप्रेस आणि हावडा पोरबंदर एक्स्प्रेस भंडारा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांना सुमारे अर्धा तास तेथेच थांबवून ठेवण्यात आले. तिकडे दुरुस्तीचे काम करून हा रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आला. मालगाडीमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित होण्याची गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी घटना होय. गेल्या रविवारी बडनेरा (अमरावती) जवळ एका मालगाडीचे कोळशाने भरलेले डबे रूळावरून घसरले. त्यामुळे नागपूर मुंबई आणि मुंबई-नागपूर लोहमार्गावरची वाहतूक प्रभावित झाली. त्यामुळे १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर ४१ गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.