नाना पटोले यांनीच निवडणुकीत उभे राहण्याची पदाधिकाºयांची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : भंडारा-गोंदिया लोकसभा संघासाठी खासदार म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच उमेदवारी घ्यावी अशी आग्रही व एक मतांनी मागणी आज मंगलमूर्ती सभागृहामध्ये शुक्रवार दिनांक २२ मार्चला आयोजित केलेल्या भंडारागोंदिया लोकसभा संघाच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या बैठकीमध्ये पदाधिकाºयांनी केलेली आहे. या बैठकीला राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार अनिल बावनकर, समाज कल्याण सभापती मदन रमटेके, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, आमगाव देवरीचे आमदार सहसराव घरोटे, झामसिंग बघेल, प्रमिला कुंटे, माजी आमदार दिलीप बनसोड व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मला एका क्षेत्रात अडकवून ठेवू नका पंजा या चिन्हावरील काँग्रेसचे सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडून आणण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील खासदारांच्या प्रचारासाठी मला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात अडकवू नका, पक्षाने जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे व एकमताने उभे राहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.आज २२ मार्चला सायंकाळी सर्व काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती यावेळी नाना पटोले यांनी दिली. या सभेला काँग्रेसचे जि. प. सदस्य, पं. स. सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने मंगलमूर्ती सभागृहामध्ये उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.