२० वर्षांनंतरही रस्त्याची दुर्दशाच, खड्डयाचा प्रवास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुरमाडी : लाखांदूर तालुक्यात पांदण रस्ते विकासात भूमिका बजावित असतात. मात्र मुरमाडीत अनेक रस्त्यांची बकाल अवस्था आहे. मुरमाडी व खैरी रस्त्याची दुर्दशा तब्बल २० वर्षांनंतरही बदलली नाही ठिकठिकाणी खड्डयाचे सापळे मोठ्या आकाराचे तलावसदृश्य डबके यामुळे पावसाळ्यात येथून रहदारी करणे म्हणजे मोठे अग्निदिव्य पार करून जाण्यासारखे आहे. गेल्या २० वर्षांत या रस्त्याचा उद्धार करण्याचे सामंजस्य कोणत्याही लोकप्रतिनिधीला कसे सुचले नाही.

मुरमाडी तथा परिसरातील शेतकºयांचा शेतावर रहदारी करण्याचा मुरमाडी खैरी एकमेव मार्ग असून या रस्त्याची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाची तत्काळ मुरमाडी खैरी मार्ग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. शेती- संबंधाने दुरुस्ती करून शेतकºयांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. स्थानिक मुरमाडी तथा परिसरातील सुमारे १२० शेतकºयांना याच मार्गाने दररोजरात्री बेरात्री शेतावर ये-जा करावी लागते. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात पावसाने या रस्त्याला पांदन रस्त्याचे स्वरूप येते. खड्डूयांतील चिखल व पाण्यामुळे येथे धान रोवणी करण्याजोगी परिस्थिती असते परिणामी हा रस्ता शेतकºयांसाठी डोकेदुखीचे कारण बनला आहे. जोरदार पाऊस पडलेला नसतानाही या मार्गाची दुरवस्था झाली आहे. पायी चालणे तारेवरची कसरत आहे यंदा पहिल्याच पावसाने या रस्त्याला पांदन वाटेचे स्वरूप आले आहे. मुरमाडी येथील हा मार्ग अद्याप दुर्लक्षित आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *