गांधी विद्यालय पहेला येथे ग्रीष्मकालीन शिबीराला प्रारंभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी वाकेश्वर : पहेला भंडारा तालुक्यातील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहेला येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा व गांधी विद्यालय पहेला यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीष्मकालीन क्रीडा व कला शिबिराला नुकताच प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्रजी कावडे यांच्या हस्ते झाले. शिबिरा दरम्यान आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव रामदास शहारे हे होते तर प्रमुख अतिथी मध्ये पोलीस स्टेशन अड्याळ येथील ठाणेदार प्रशांत मिसाळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, पहेला येथील सरपंच मंगलाताई ठवकर, पोलीस पाटील चंद्रशेखर खराबे, प्राचार्य डी.जी.काटेखाये, जेष्ठ शिक्षक वाय.एन.काटेखाये प्रामुख्याने उपस्थित होते. या ग्रीष्मकालीन क्रीडा व कला शिबिरामध्ये रग्बी, बुद्धिबळ, योगा, टारगेट बॉल, डॉज बॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, चित्रकला, मेहंदी कला, जुम्मा डान्स, शिल्पकला या विषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी क्रीडा शिक्षक डी.बी.टेकाम, दीपक बावणे, एम.एस.देशमुख, कु. पुष्पा गिरडकर, करुणा कावडे, सूरजकुंवर मडावी, शुभांगी गोंडाणे, सरिता बोधाणे, मीनल निर्वाण आदी शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *