राज्यस्तरीय पुरस्काराने मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाचा गौरव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाला नुकतेच वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा शुक्रवार दि.७ एप्रिल २०२३ ला सकाळी १० वाजता पार पडला. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत तसेच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात आली. यात नागपूर विभागातून मोहाडी तालूका मराठी पत्रकार त्यांचा गौरव करीत असते. यावेळी उल्लेखनीय कार्य करणा-या राज्यातील ८ तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात आली. यात मोहाडी, धामणगाव, औढा नागनाथ, पुरंदर, अमळनेर, जत, पैठण, महाड या तालुका पत्रकार संघाला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून पुरस्कार देण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्याचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, प्रमुख पाहुण्यात दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खा.संजय राऊत, स्वागताध्यक्ष आ.रोहित पवार, संघाला हा मान मिळाला. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेला मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघ नेहमीच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. मराठी पत्रकार परिषद वेळोवेळी अशाच उल्लेखनीय कार्य करणाºया पत्रकार संघाची निवड करून विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, नागपूरच्या शोभा जयपूरकर, संजय देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले मांडले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्तएस.एम.देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध समस्येची जाण करून देत न्याय मिळवून देण्यासाठी निरंतर कार्य सुरु असल्याचे सांगितले.

उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाला स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे वरठी, सचिव चंद्रशेखर साठवणे मोहाडी, उपाध्यक्ष युवराज गोमासे पालोरा, तथागत मेश्रामवरठी, कोषाध्यक्ष संजय मते आंधळगाव, सदस्य भोजराम तिजारेपालोरा, सुधीर गोमासे खरबी, मुनेश्वर मलेवार देव्हाडा, भगवान पवनकर, भुपेन्द्र पवनकर, यादोराव मुंगमोडे, आशा वैद्य जाभोरा, राजू तुमसरे करडी, विलास बन्सोड उसरला, नितीन लिल्हारे सालई खुर्द, प्रितम गोळंगे जांब, रमेश लेदे लोहारा, मंगेश डहाके पालडोंगरी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यशवंत थोटे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर आभार परिषदेचे अहमदनगर जिल्हाप्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी मानले. मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघावर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चैतन भैरम, गोपाळकृष्ण मांडवकर,डी.एफ.कोचे राकेश चेटूले, मिलिंद हळवे, शशीकुमार वर्मा, इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, बबन मेश्राम, हिवराज उके, काशिनाथ ढोमणे, संदीप नंदनवार, अजय मेश्राम, सुरेश कोटंगले, सुरेश फुलसुंगे, दीपक फुलबांधे, राजू आगलावे, प्रशांत निखाडे, विजय खंडेरा, प्रशांत देसाई, तेजस मोहतुरे, अभिजीत घोरमारे, प्रवीण तांडेकर, नेहाल भुरे, उदय चक्रधर, दिपक रोहणकर, विलास सुदामे, प्रमोद भांडारकर, सागर भांडारकर, प्रमोद नागदेवे, बाबा बाच्छिल, मुकेशकुमार मेश्राम, सूरज परदेशी, अमोल गोटेफोटे आदी पत्रकारानी शुभेच्छा वर्षाव केला. याबाबत मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाने आभार व्यक्त केले.

संघाचे विविध कार्य

विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या पावनभूमीत मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघात मोहाडी, वरठी, आंधळगाव, करडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वच वृत्तपत्राच्या प्रतिनिधी एक संघ म्हणून कार्य करतात. वृत्त लिखाणा सोबत संघ नेहमी विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीरचे आयोजन करणे, स्वछता अभियानात सहभाग घेणे, कोरोना काळात मार्गदर्शन कार्यक्रम, गरीब व गरजु विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, शिवाय सामाजिक व राजकीय जीवनात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिमत्वाचे संघाच्या वतीने सत्कार, दरवर्षी पत्रकारांसाठी विविध प्रेक्षणीय ठिकाणी सहलीचे आयोजन, संघातील गरजू पत्रकार बंधूंना आर्थिक मदत शिवाय जिल्हा पातळीवर भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमात मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाचा सहभाग असतो.

मोहाडीत होणार भव्य राज्यस्तरीय मेळावा

अखिल भारतीय पत्रकार परिषद शहरी तसेच ग्रामीण पत्रकारांचे विविध प्रश्न शासनास्तरावर मांडून सातत्याने लढा देत आह?. परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकार संघाला गौविण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळे हे प्रामुख्याने ग्रामीण भागातच आयोजित केले जातात. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आगामी काळात होणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या पावनभूमीत हा मोहाडी तालुक्यात होणार आहे. यात राज्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहील असे मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे वरठी, सचिव चंद्रशेखर साठवणे मोहाडी यांनी दैनिक भंडारा पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *