विद्यार्थिनींनी दोन ते अडीच किलोमीटर पायी गाठली शाळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शासनाद्वारे वर्ग पाच ते बाराचे विद्यार्थिनींना शाळेत मोफत नेआन करण्याकरिता मानव विकास योजने अंतर्गत निळ्या बसेस एसटी महामंडळास उपलब्ध करून दिल्या असून अनेकदा महामंडळातर्फे मानव विकासच्या बसेस ऐवजी लाल बसेस पाठवण्यात येत असून आज तिरोडा आगारातून मानव विकासचे बस ऐवजी पाठवण्यात आलेली लाल बस रस्त्यात बंद पडल्याने विद्यार्थिनींनी दोन ते अडीच किलोमीटर पायी जात शाळा गाठयल्याचा प्रकार घडला आहे. तिरोडा येथुन घाटकुरोडा तिरोडा मार्गावरील तिरोडा येथील शाळेत शिक्षणाकरता येणाºया मुलींकरीता दररोज सकाळी घाटकुरोडा येथे मानव विकासची बस पाठवण्यात येते मात्र अनेकदानिळ्या बसेस दुसरीकडे पाठवण्यात आल्याने निळ्या बस ऐवजी लाल बस घाटकूरोडा येथे पाठवण्यात येते तिरोडा आगारात मानव विकास च्या सात बसेस सह एकूण ४४ बसेस असून यातील काही बसेस अत्यंत जुन्या असून या बसेस दररोज कुठेतरी बंद पडत असतात तसाच प्रकार आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी घडला असून तिरोडा आगारातून घाटकुरोडा येथे मानव विकास चे निळ्या बस ऐवजी एम एच ४०/ ५४०५ क्रमांकाची लाल बस पाठवण्यात आली ही बस घाटकुरोडा येथून विद्यार्थिनींना घेऊन तिरोडाकडे येत असता तहसील कार्यालयासमोर बंद पडल्याने या विद्यार्थिनींना दोन ते अडीच किलोमीटर पायी जात आपली शाळा गाठावी लागली तिरोडा आगाराच्या बसेस नेहमीच रसत्यात बंद पडत असून यामुळे प्रवासी चालक वाहक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो याबाबत आगार व्यवस्थापक के.जी भोगे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितल्यानुसार आगारातील बसेस जुन्या झाल्या असून येथे मेकॅनिकची संख्याही कमी असल्याने बसेस पूर्णपणे दुरुस्त होण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने तसेच एखाद वेळी निळ्या बसेस नादुरुस्त असल्यास मानव विकास या शेडूलवर लाल बसेस पाठवण्यात येत असल्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *