काम जबाबदरीने केल्यास त्याचे फळ अवश्य मिळणार !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : माणसाची एक चूक त्याचे भविष्य खराब करू शकते, म्हणून कोणतेही काम असो त्याला संपूर्ण जबाबदारी ने केल्यास त्याचे फळ मिळते आणि मनुष्याचे जीवन घडवून जाते. असे वक्तव्य आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. ते भोंडेकर सांस्कृतिक क्रीडा व शिक्षण संस्थेच्या तीन दिवसीय वर्षीक स्नेह सम्मेलन ‘अस्तित्व’ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या तीन दिवसीय सम्मेलना दरम्यान सिने कलाकार पद्मिनी कोल्हापुरे, शक्ति कपूर आणि आदित्य पांचोली हे सुद्धा शमिळ झाले आणिविद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. भोंडेकर सांस्कृतिक क्रीडा व शिक्षण संस्थेच्या वतीने प्रती वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा तीन दिवसीय अस्तित्व या स्नेह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते सरस्वती माता आणि संस्थेचे संस्थापक स्व. भोजराजजीभोंडेकर यांच्या तैलचित्रांचे पूजन करून करण्यात आले.

प्रथम दिनी संस्थे अंतर्गत असलेल्या विविध विद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यकामांची प्रस्तुती करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ज्यात एकल नृत्य, समूह नृत्य आणि समाजाला संदेश देणाºया नाटीकांचे समावेश होते. स्नेह सम्मेलनाच्या पूर्वी संस्थेच्या संपूर्ण विद्यालय व महाविद्यालयाचे विविध स्पर्श घेण्यात आल्या आणि आयोजणाच्या अंतिम दिनी या विविध स्पर्धेच्या व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विजेत्यांना पुरस्कार वितरित करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. वरील स्नेह सम्मेलना दरम्यान आम. नरेंद्र भोंडेकर सह संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती मंजुळताई भोंडेकर, सचिव डॉ. अश्विनी भोंडेकर, उपाध्यक्ष रमेश चवडे, पूजा नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक सिंघल शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बलपांडे, नगर परिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आधी उपस्थित होते. आयोजनाच्या यशस्वीते करिता शिक्षण संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी अथक प्रयत्न केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *