बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरकडून मूलभूत कर्तव्यांच्या वाचनासंबंधी शासनाला निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरकडून तहसीलदार लाखांदूर यांचे मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, मुख्य सचिव, शिक्षण सचिव मुंबई, शिक्षण आयुक्त पुणे, संचालक म. रा. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे, शिक्षण संचालक माध्य. व उच्च माध्य. शिक्षण संचानालय, पुणे, जिल्हाधिकारी भंडारा, शिक्षणाधिकारी माध्य व शिक्षणाधिकारी प्राथ. भंडारा यांना मूलभूत कर्तव्यांचे वाचन व्हावे या मागणीसाठी बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरकडून दि. २९ मार्च २०२३ ला निवेदन अखिभारत मेश्राम, नायब तहसीलदार लाखांदूर यांनी स्विकारून संबंधितांना लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे सांगीतले. निवेदनात सुरुवातीलाच म.रा. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे द्वारा प्रकाशित पाठ्यपुस्तके वर्ष २०२१ व २०२२ हा पुर्नमुद्रित पुस्तकात भारताच्या संविधानातील भाग ४ क मधिल नागरिकांची मूलभूत कर्तव्ये छापल्याबद्दल बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूर ने मंडळांचे व महाराष्ट्र शासनाचे आभार मानून मन:पूर्वक धन्यवाद दिले. संविधान सभेत मान. डॉ. बी. आर. आंबेडकर अध्यक्ष मसुदा समिती, के. सन्तानम, जसपतराय कपूर, अम्मू स्वामिनाथन या संविधान सभेतील विद्वान सदस्यांनी भारतीय समाज मुळात अलोकशाहीवादी असल्यामूळे त्यांच्यात संविधानिक नैतिकता रुजविणे, विकसीत करणे गरजेचे आहे.
त्यांच्यामध्ये संविधान लोकप्रिय बनविण्यासाठी उपाय करणे, संविधानाप्रती देशात आदर व श्रद्धेची भावना निर्माण करणे व नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवण्याबरोबरच त्यांचे राज्याप्रति कर्तव्ये व उत्तरदायित्व यांची जाणीव करून देणे तसेच महाविद्यालय व विद्यापीठातील सर्व विद्याशाखात ‘भारताचे संविधान’ हा विषय शिकविणे गरजेचे असल्याचे मत संविधान सभेत व्यक्त करणाºया मताचा हवाला देवून पूढील तिन मागण्या निवेदनातून केल्या. यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी व्यवस्थापनाची कार्यालये तसेच त्यांच्या व्दारा संचालित शाळा महाविद्यालयात भारताच्या संविधानातील उद्देशिके प्रमाणेच मूलभूत कर्तव्ये दर्शनी भागात लावण्याबाबत तसेच सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी शाळा महाविद्यालयात उद्देशिका, राष्ट्रगीत व प्रतिज्ञेसोबत दररोज मूलभूत कर्तव्यांचेही वाचन व्हावे. सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयात राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रगीतासोबतच उद्देशिका व मूलभूत कर्तव्यांचे वाचन व्हावे.
महाराष्ट्रातील सर्व विद्या शाखांमध्ये ‘भारताचे संविधान’ हा विषय अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यात यावे. वरील तिनही मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांची पूर्तता करण्यासाठी उचीत कार्यवाही करण्याची मागणी बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरचे अध्यक्ष अनिल कारुजी काणेकर यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *