मंगळवारपासून भंडारा जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणा-या काँग्रेस नेत्यांना सावरकर कळावेत आणि सावरकरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने मंगळवार दि. ४ आणि बुधवार दि. ५ एप्रिल रोजी भाजपा, शिवसेनेच्या वतीने भंडारा जिल्ह्यात विधानसभा निहाय सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांनी शनिवारी दिली. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा होत असलेला अपमान प्रत्येक देशवासीयांच्या सावरकर प्रेमावर आघात करणारे आहे.
या अनुषंगाने भाजप शिवसेनेच्या वतीने राज्यातील सर्व विधानसभांमध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील आयोजना संदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने शनिवार दि. १ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुनील मेंढे, माजी आमदार परिणय फुके यांनी माहिती देताना सांगितले की, संपूर्ण महाराष्टÑात ४ एप्रिल ला सावरकर गौरव यात्रेला सुरुवात होत आहे. सावरकरांविषयी केले जात असलेले अपमानास्पद वक्तव्य सावरकरांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे. राजकीय स्वाथार्साठी स्वातंत्र्यवीरांच्या कार्यावर बोट ठेवणाड्ढयांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ही गौरव यात्रा होणार आहे. या यात्रेत सर्व जातीधर्मांच्या लोकांना घेऊन सावरकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली अशा तिनही विधानसभा क्षेत्रात सावरकर गौरव यात्रा ४ आणि५ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. भंडारा येथे ४ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळात राजीव गांधी चौक ते गांधी चौकापर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून आणि सावरकर गौरव रथाच्या सोबतीने ही यात्रा काढण्यात येईल. गांधी चौकात यात्रेचा समारोप होणार आहे. भंडारा येथे खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात यात्रा होणार आहे. तर साकोली येथे लहरीबाबा मठ ते होमगार्ड परेड ग्राऊंड दरम्यान यात्रा काढली जाणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांसोबतच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ४ एप्रिलला संध्याकाळी ५ ते ८ या वेळात हा कार्यक्रम माजी आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात होईल. तुमसर विधानसभेची सावरकर गौरव यात्रा तुमसर शहरात ५ एप्रिल रोजी होणार आहे. बावनकर चौक ते राजाराम लॉन पर्यंत काढण्यात येणाºया गौरव यात्रेत सावरकर गौरव रथाचा समावेश राहणार आहे.
ही यात्रा माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या नेतृत्वात संध्याकाळी ५ ते ८ वाजता होईल. सावरकरांच्या कार्याविषयी केल्या जाणाºया अपप्रचारापासून सर्वसामान्य जनतेला अवगत करण्याच्या दृष्टीने आणि स्वातंत्र्यवीरांच्या गौरवासाठी या यात्रेत सर्वसामान्य लोकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खा. सुनील मेंढे, माजी आमदार परिणय फुके यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिºहेपुंजे, माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा महामंत्री चैतन्य उमाळकर, डॉ. उल्हास फडके, माजी आमदार बाळा काशिवार, विनोद बांते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *