पोलीस उपनिरीक्षक ज्ञानीराम गोबाडे यांचा सपत्नीक सेवानिवृत्त सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील दिघोरी पोलीस स्टेशन कार्यालयात कार्यरत असलेले पोउपनि ज्ञानीराम गोबाडे यांच्या सपत्नीक सेवानिवृत्त सत्कार समारंभ सोहळा शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला. यावेळी गोबाडे यांनी पोलीस विभागात ३५ वर्ष १ महिना सेवा कार्यकाल उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल पो. उपनि गोबाडे व त्यांच्या धर्मपत्नी विमल गोबाडे यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार हेमंत पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते तर प्रमुख अतिथी ठाणेदार गिºहेपुंजे, दिघोरे, बंडू येरणे, रवी परशुरामकर साकोली आदी मान्यवर उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी गोबाडे यांच्या जीवन चरित्रावर व सेवाकाळाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की, पोउपनि गोबाडे यांनी पोलीस विभागात ३५ वर्ष १ महिना नौकरी केली व त्यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीची तथा कर्तव्यदक्षतेची दखल म्हणून पोलीस महासंचालकांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. गोबाडे यांनी कर्तव्याच्या काळात त्यांनी भंडारा, साकोली, मोहाडी, लाखणी, पवनी अशा अनेक ठिकाणी अमुलाग्र कामगिरी केली असल्याचा विशेष उल्लेख केला. सदर सेवानिवृत्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाला परिसरातील सर्व पोलीस पाटील, पत्रकार मंडळी, गणमान्य व्यक्ती, पोलीस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी गौरी वनवे, सतीश पुराम, रूपचंद वैद्य, घनश्याम कोडापे, हितेश मडावी, कांबळे, रणदिवे, वच्छला चाचेरे, दिपाली मांढरे, मानक शेंडे, वासनिक, पांडे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन घनश्याम कोडापे यांनी तर आभार तिरपुडे यांनी मानले पवनी वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, मनोज बोरकर, सहाय्यक वनअधिकारी जे.दिघोरे, बंडू येरणे, रवी परशुरामकर साकोली आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी गोबाडे यांच्या जीवन चरित्रावर व सेवाकाळाविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की, पोउपनि गोबाडे यांनी पोलीस विभागात ३५ वर्ष १ महिना नौकरी केली व त्यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीची तथा कर्तव्यदक्षतेची दखल म्हणून पोलीस महासंचालकांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. गोबाडे यांनी कर्तव्याच्या काळात त्यांनी भंडारा, साकोली, मोहाडी, लाखणी, पवनी अशा अनेक ठिकाणी अमुलाग्र कामगिरी केली असल्याचा विशेष उल्लेख केला. सदर सेवानिवृत्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाला परिसरातील सर्व पोलीस पाटील, पत्रकार मंडळी, गणमान्य व्यक्ती, पोलीस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी गौरी वनवे, सतीश पुराम, रूपचंद वैद्य, घनश्याम कोडापे, हितेश मडावी, कांबळे, रणदिवे, वच्छला चाचेरे, दिपाली मांढरे, मानक शेंडे, वासनिक, पांडे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन घनश्याम कोडापे यांनी तर आभार तिरपुडे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *