३५ किलोचा हार व १०० किलोच्या फुलांचा वर्षाव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात दि.११ सप्टेंबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या काँग्रेसचया जनसंवाद यात्रेचे जिल्हा परिषद चौकात मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. तिरोडामार्गे भंडाºयात दाखल झालेल्या जनसंवाद यात्रेचे भगतसिंग वार्ड भंडारा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.त्यानंतर संपुर्ण भंडारा शहरातुन हि यात्रा काढण्यात आली.जिला परिषद चौक भंडारा येथे पुजा ठवकर व तालुका कांग्रेस कमेटी तफे जनसंवाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. नानाभाऊ पटोले यांना ३५ किलो चा पुष्पहार चढवित १०० किलो फुलांच्या पुष्पवर्षावाने नाना पटोले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यासह फटाके फोडुन व डिजेवर देशभक़्तीपर गीतांच्या माध्यमातुन भव्यदिव्य असासत्कार करण्यात आला . यावेळी सुभाष आजबले, मोहन पंचभाई, पुजा ठवकर, प्यारेलाल वाघमारे, पंशात देशकर, जि.प.सदस्या कविता ऊईके गायत्री वाघमारे. अनिता भुरे ,पं.स.सदस्य काजल चवळे , सीमा रामटेके , रुचिता मेश्राम,माजी नगर सेवक शमीम शेख,महिला जिल्हा अध्यक्ष जयश्री बोरकर ,बालु ठवकर , धनराज साठवने ,पंवन वजारी ,राधे भोंगाडे ,सतीश सावै ,पंकज सुखदेवे ,स्वप्निल आरीकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.