रस्ता दुरूस्तीसाठी युवक कॉंग्रेसचे रस्ता रोको आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील ग्राम दाभा मोड ते माडगी हा रस्ता पुर्णपणे उखडला असुन या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी आज दि.१२ सप्टेंबर रोजी भंडारा जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वात दाभा मोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्ता एक महिन्यात दुरूस्तीचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दाभा मोड ते माडगी हा दोन जिल्ह्यांना जोडणारा राज्यमार्ग असुन ग्रामीण भागातील नागरीकांसाठी अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मागार्ने मोठया प्रमाणात नागरीक, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, नौकरदार वर्ग व जिल्हयाच्या ठिकाणी कामा निमीत्त शेकडों हजारो नागरीक या मागार्ने प्रवास करतात. मात्र हा मार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असुन रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. प्रवास करतांना खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकी व सायकलस्वारांचा या ठिकाणी अपघात होवुन अनेकांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचीदुखापत झाली आहे. तर अनेकांना कायमचा अपंगत्व, तर काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

मागील अनेक वषार्पासुन या रस्त्याच्या दुरूस्तीकरीता अनेक सामाजीक संघटना व राजकिय पक्षाच्या वतीने निवेदने देण्यात आले मात्र त्यचे प्रशासनाला गांभीर्य दिसुन येत नव्हते.अखेर आज भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वात दाभा मोड येथे रस्ता रोको आंदोलन करून भंडारा-तुमसर माग अडविण्यात आला.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसात रस्त्यातील खड्डे भरण्याचे व एक महिन्यात रस्ता नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे कार्यालयीन पत्र कार्यकारी अभियंता पराग ठमके यांनी लेखी स्वरूपात दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात बालू ठवकर,पंकज उके, विनीत देशपांडे, आकाश ठवकर, मुलचंद ईर्श्वरकर, शेखर ईश्वरकर, राधे भोंगाडे,रोहित खंडाईत, इर्शाद खान, अनिल ईर्श्वरकर, मनोज ईर्श्वरकर, सोहेल शेख, आकाश चोपकर, राहुल ईर्श्वरकर, माधव साकुरे, दामोधर चोपकर, महेश शेंडे,रोशन बंसोड, विजय आस्वले, गंगाराम खोकले, गौरीशंकर शेंडे, विक्रम बोंदरे आदि सहभागी झाले होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *