मंदिराची गेट जोडतांना विद्युत करंट लागून मजुराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : श्री संत गजानन महाराज देवस्थान मंदिर मधील ग्रील गेट वेल्डिंग मशीनने जोडत असतांना विदयुत करंट लागून वेल्डिंग करणाºया मजुराचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे आज १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ . ४५वाजताचे दरम्यान घडली. शेखर खुशाल कुत्तरमारे रा. जैतपूर वय ३४ वर्ष असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. मागील वर्षी जैतपूर येथे गाववर्गणीतून संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम करण्यात आले. व मंदिराचे लोकार्पण सुद्धा झाले होते. मात्र देवस्थानाला गेट नसल्याने गेट लावण्याचे काम देवस्थान कमिटीने गावातीलच वेल्डिंगचे दुकान चालक राहुल चौधरी यांना देण्यात आले होते. आज १२ सप्टेंबर रोजी गेट लावण्याचे काम सुरु होते.

गेट वजनदार असल्यामुळे मृतकासह अन्य नऊ इसमांनी गेट पकडून ठेवली होती. मात्र वेल्डिंगचे काम सुरु करताच गेटला करंट आले व पायात चप्पल असलेले अन्य नऊ इसम विदयुत झटक्यात बाहेर फेकल्या गेले व किरकोळ जखमी झाले. मात्र मृतकाला पकडून ठेवले. लाट्या काठ्या मारून उपस्थित लोकांनी त्याला सोडविले. मात्र लाखांदूर येथे उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच वाटेत शेखरच्या मृत्यू झाला . मृतकांची परिस्थिती अत्यन्त हलाकीची असून कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यासाठी मिळेल तो काम करीत असे. मात्र घरातीलच कर्ता पुरुष मृत पावल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्याच्या मागे आई वडील पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *