६ तासात दुचाकी चोरटा जेरबंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : चिकन घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची एक्टीव्हा दुचाकी चोरून नेल्याची घटना सोमवारी (ता. ११) दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या ६ तासात आरोपीला अटक केली आहे. स्वप्निल शंकर राऊत वय२८ वर्ष रा. संतोष नगर नागपूर असे लाखनी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला लाखनी परिसरातच रात्री ११.०० वाजताच्या सुमारास अटक केली सुरज राजू पाखमोडे हा घराजवळील राहुल मते यांची एक्टीव्हा दुचाकी (क्र. एम एच ३६ एके ०४९४ ) घेवून चिकन घेण्यासाठी केसलवाडा (फाटा) येथे गेला. गाडी रस्त्याच्या कडेला लावून चिकन घेण्यासाठी चिकन च्या दुकानात गेला.

चिकन घेवून झाल्यावर तो गाडी ठेवलेल्या ठिकाणी गेला. तिथे गाडी दिसून आली नाही. तिचा आजू बाजूला शोध घेतला परंतु दिसून न आल्याने सुरज ने पोलीस स्टेशन गाठले. घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळ गाठून गाडीचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी तपासाची चक्रे फिरवली. व आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले. रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखनी परिसरात त्याला गाडीसह अटक करण्यात करण्यात आली.पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपणच गाडी चोरी केल्याचे काबुल केले. हि कार्यवाही पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलीस अंमलदार पंकज निरगुळे, प्रशांत धकाते यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *