ग्राम पंचायत कर्मचाºयाला मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : नळ योजनेची पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना ग्रामपंचायत कर्मचाºयाला मारहाण केल्याप्रकरणी एका आरोपीविरोधात दिघोरी (मोठी) पोलिसांनी गुन्हादाखल करून अटक केली आहे. सदर घटना लाखांदूर तालुक्यातील साखरा येथे रविवारी सकाळी ९.१५ वाजता दरम्यान घडली . पंकज सुखराम शेंडे (२२)असे मारहाण करण्याºया आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार साखरा ग्रामपंचायतीचे शिपाई दिपक मोरेश्वर कोहळे (३८) रा.साखरा येथील गावातील ग्रामपंचायतीच्या नळ योजना पाईपलाईन चे दुरुस्तीचे काम मजुरामार्फत करीत असताना पंकज सुखराम शेंडे या तरुणाने उद्या पासून नळ आले नाही तर ग्रामपंचायत पेटवून टाकीन तसेच पाण्याची टाकी फोडून टाकीन अशी धमकी देऊन शिवागाळी करणे सुरू केले. ग्रामपंचायत शिपाई दिपक कोहळे यास पुन्हा शिविगळी करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली .व जखमी करण्याच्या हेतूने सिमेंट रस्त्यावर पाडले त्यामुळे फिर्यादी दिपक कोहळे यांच्या डोक्याला मार लागला.सदर घटनेची तक्रार दिघोरी (मोठी) पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी कलम ३५३,३३२, ५०४,५०६ भांदवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पंकज सुखराम शेंडे यास अटक केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *