दुचाकी व पेट्रोल चोरांचा श्रीनगरात धुमाकूळ

लाखनी : गेल्या अनेक महिन्यापासून रात्रीचा फायदा घेऊन गेटवरून सरळ आत प्रवेश करून मोटार सायकलमधून पेट्रोल चोरणे व संधी मिळताच मोटारसायकल देखील चोरणे असा प्रकार आता नित्याचा झाला असल्याकारणाने मुरमाडी येथील श्रीनगर कॉलनीत मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली असून याकडे लाखनी पोलिसांनी विशेष सापळा रचून अशा चोरांना जेरबंद करणे आवश्यक झाले आहे. १५ एप्रिल शनिवारच्या रात्री १२ ते १ च्या दरम्यान संतोष खंडारे गुरुजी श्रीनगर मुरमाडी येथील सतत रहदारी असलेल्या रस्त्यावरील घराच्या गेटच्या आत प्रवेश करून बिनधास्तपणे गेटचा ताला उघडून जवळपास चार मोटार सायकल पेट्रोल पाईप कापून पूर्ण पेट्रोल रिकामे करून एक हिरो होंडा मोटार सायकल घराच्या बाहेर काढून चोरण्याचा प्रयत्न केला. या मोटार सायकलचे सर्व वायर काढून डायरेक्ट करून पाहण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.

परंतु या मोटार सायकलमध्ये तशा प्रकारची वायरिंग सुविधा नसल्याने व मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने चोरांनी ही मोटार सायकल राष्ट्रीय महामार्गावरील मल्हारी आॅटो मेकॅनिक यांच्या शेडमध्ये तशीच ठेवून पोबारा केलेला आहे. मोटारसायकल मधून पेट्रोल चोरी हा प्रकार सलग दोन-तीन वषार्पासून बिनधास्त सुरू असून याबद्दल केवळ बोलले जाते. परंतु कोणीही पोलिस स्टेशनला रिपोर्ट करीत नाहीत. या घटनेची खबर स्वत: खंडारे यांनी लाखनी पोलिस स्टेशनमध्ये दिली. अद्याप काहीही झाले नाही. सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्ला मात्र देण्यात आला. याच रस्त्यावर बोरकर यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे मात्र अद्यापही तपासण्यात आलेला नाही. घरात घुसून मोटार सायकल मधील पेट्रोल चोरून नेणे हा प्रकार आता नित्याचा झालेला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *