लाखांदुरातील जुन्या बसस्टॉप परिसरातील सिमेंट रस्त्यावर साचतोय पाणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने रस्ते बांधकाम केले आहे. मात्र सिमेंट रस्त्याचे सदोष बांधकाम केल्याने चक्क सिमेंट रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार स्थानिक लाखांदूर नगरपंचायत क्षेत्रातील जुना बस स्टॉप परिसरात उघडकीस आला आहे. स्थानिक लाखांदूर येथील शिवाजी टि पॉईंट ते किन्हाळा पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. हा सिमेंट रस्ता बांधकाम करताना विविध टप्प्यांत काम करण्यात आले. सिमेंट रस्त्याच्या बाजूला गट्टूचे बांधकाम केले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम देखील करण्यात आले आहे. दरम्यान, सिमेंट रस्ता बांधकाम करताना रस्त्यावर पाणी साचू नये याची दक्षता घेतली जाते.

रस्त्यावरील पाणी काढण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली असताना देखील चक्क सिमेंट रस्त्यावरच पावसाचे पाणी साचत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी जवळपास ३ ते ४ दिवस निघत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर साचणाºया पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.