नैसर्गिक आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्या!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कान्हाळगाव या गावी मागील वर्षी वादळ वारा आणि अतिवृष्टी झाल्याने काही नागरिकांचे राहते घर कोसळून क्षतिग्रस्त होऊन जमीन दोस्त झाले त्यामुळे या आपात ग्रस्त नागरिकांसमोर निवाºयाचा प्रश्न आवासून उभा ठाकला असून एक विशेष बाब म्हणून सदर गरजू व गरजवंत आपात ग्रस्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने मार्फत घरकुल योजनेचा तात्काळ लाभ देण्याची तसदी घ्यावी अशी कळकळीची मागणी करण्यात येत असून याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर या विरोधात केव्हाही तीव्र जन आंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी सबंधित विभागाची राहील असा इशारा कान्हाळगाव ग्रामपंचायतचे सरपंच समीर मस्के यांनी दिला आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात लाखनी तालुक्यातील कान्हाळगाव येथे वादळ वा-यासह अतिवृष्टी झाल्याने काही नागरिकांचे राहते घर कोसळून क्षतिग्रस्त होऊन जमीन दोस्त झाल्याने याबाबत ग्रामसेवक, व तलाठी यांनी प्रत्येक्ष मोका पाहणी सह पंचनामे करून याबाबतचा प्रस्ताव तालुका व जिल्हास्तरीय अधीनस्त सबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आला. त्यामुळे सबंधितयंत्रणेने गांभीर्याने एक विशेष बाब म्हणून या आपातग्रस्त नागरिक लाभार्थ्यांना विहित कालावधीच्या आत प्रधानमंत्री आवास योजने मार्फत घरकुल योजनेचा लाभ देणे काळाची गरज होती परंतु अद्याप पर्यंत या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सदर लाभार्थी दुसºया नागरिकांच्या घरी किरायाने राहत असल्याने ते समस्याग्रस्त झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांची एकूण संख्या १९०० आहे. मात्र, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही हे अन्यायकारक आहे. सरकार कोणाचे ही असू द्या भारतीय संविधानातील लोककल्याणकारी तरतुदीनुसार गरजू व गरजवंत नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण, पाणी व रोजगार उपलब्ध करून देणे ही केंद्र आणि राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे.

परंतु ज्यांना आवश्यकता नाही अशा नागरिकांना शासकीय योजनांचालाभ मिळतो आणि ज्यांना खरी गरज आहे अशा गरजवंत नागरिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते किंवा लाभापासून वंचित ठेवले जाते ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. यावर्षी मे, जुन महिन्या पासून पावसाळा ऋतूला सुरुवात होणार असून आतापासून वादळ वाºयासह अवकाळी पाऊस पडत आहे. तरीपण या आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आपले या पावसाळ्यात कसे होणार,कुठे राहणार? या चिंतेने सदर लाभार्थी चिंताग्रस्त झाले असून त्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याबाबत सदर लाभार्थ्यां मध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याप्रकरणी शासन प्रशासनाच्या अधीनस्त सबंधित विभागाच्या यंत्रणेने मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूती पूर्वक गांभीर्याने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून लाखनी तालुक्यातील कान्हाळगाव येथील अतिवृष्टी ग्रस्त लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा तात्काळ लाभ देण्याची तसदी घ्यावी, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास याविरोधात तीव्र जन आंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी सबंधित विभागाची राहील, असा इशारा सरपंच समीर मस्के यांनी दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *