तहसीलदारांनी आवळल्या रेती तस्करांच्या मुसक्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : येथील तहसीलदार दीपक कारंडे यांनी रोहा रेती घाटावर कारवाई करून याठिकाणी साठवून ठेवलेली ९० ब्रास रेती जप्त केली. ही रेती तहसील कार्यालयाच्या आवारात आणली असून आतापर्यंत ४७५ ब्रास रेती जप्त करण्यात आल्याने तहसील कार्यालयासमोर रेतीचे ढिगचे ढीग दिसत आहेत. तहसीलदार दीपक कारंडे यांनी काही दिवसात मोहगाव/देवी,बोथली/पांजरा आणि खमारी बुज. रेती घाटांवर धाड टाकून रेती तस्करांवर कारवाई केली. यावेळी नदी काठावर जमा करून ठेवलेली अंदाजे २५० ब्रास रेती जप्त करून ती उचलून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवली. त्यानंतर काही खाजगी व सार्वजनिक ठिकाणचीही साठवणूक केलेली रेती उचलून आणली. शासकीय कामासाठी ही रेती लिलाव करण्यात येणार आहे. या कारवाईने रेती चोरांचे धाबे दणाणले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *