धावत्या स्कुटीला अचानक आग पाहता-पाहता जळून खाक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा येथे आज गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता च्या सुमारास शहरातील शिंगाडा तलाव काठा जवळील रस्त्याने जात असताना अचानक स्कुटीला आग लागून गाडी जळून राख झाली असल्याची घटना घडली . शास्त्री वार्ड तिरोडा निवासी सौ. नूतन सुकलाल बिसेन या जिल्हा परिषद शाळा विहिरीगाव येथे शिक्षिका असून त्या आपल्या पतीसोबत शाळेकडील शिंगाडा तलाव काठावरील रस्त्याने जात असताना स्कुटीतून अचानक धूर निघू लागला. दरम्यान त्यांनी वेळ न घालवता ती गाडी तिथेच सोडून ते बाजूला झाले. त्यांच्या डोळ्या देखत स्कूटी गाडीने पेट घेतला व पूर्ण जळून गाडीची राखरांगोळी झाली. पण अचानक घडलेल्या या घटनेत वेळ प्रसंगी सूचकता दाखविल्यामुळे सुदैवाने पती पत्नी दोघेही सुखरूप वाचले. सकाळच्या सुमारास घडलेली ही घटनेची माहिती तिरोडा शहरात वाºयासारखी पसरली असता पेट घेऊन राख रांगोळी झालेल्या स्कूटीला बघण्याकरिता घटना स्थळी लोकांनी गर्दी केली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *