गत वर्षीच्या संस्थांना धान खरेदीचे आदेश द्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- खरीप हंगामात नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली असतांनाही अजून पर्यंत भंडारा जिल्ह्यात शासकिय धान्य खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परिणामी शेतकºयांची आर्थिक कुचंबणा होत आहे. ती कुचंबणा टाळण्यासाठी गत वर्षी ज्या संस्थेने संपूर्ण निकष पूर्ण अशा संस्थांना धान खरेदी करण्याचे आदेश द्यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना भंडारा जिल्हा धान खरेदी संघ तर्फे देण्यात आले . नोव्हेंबर महिन्याला सुरुवात सुरुवात झाली मात्र अजून पर्यंत जिल्ह्यात धान खरेदी करण्याचे आदेश अजून पर्यंत देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.गत हंगामात काही धान खरेदी केंद्रात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील संपूर्ण १९० संस्थेला धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात आलेनाही. मात्र मागील पणन हंगामातील विहीत निकष पुर्ण करणारी खरेदी केंद्र खरीप पणन हंगाम २०२२- २०२३ मध्ये सुरू ठेवण्यात यावीत. तथापी अशी खरेदी केंद्र सुरू करण्याअगोदर त्या केंद्रांबाबत मागील पणन हंगामामध्ये तक्रार नसल्याची किंवा त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावीत नसल्याची खात्री करून अशा संस्थांना धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच वेळेवर बारदाना, गोदाम भाडे दर वर्षी मिळावे, संस्थांना खरेदी कमिशन व अनुषंगिक खर्च वेळेत मिळावे, धानाची घट १ टक्के असुन ३ टक्के करणे व खरेदी सुरू होताच धानाची उचल करावे अशा मागणी चे निवेदन देण्यात आले .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *