महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवीदिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. या प्रकरणी आता चार आठवड्यानंतर सुनावणी होईल. आजच्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही बाजूंना आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्याचा आणि सादर करावयाच्या मुद्यांवर विचार करण्याचा आदेश दिला. दोन्ही बाजूंनी कोणते मुद्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद करणार आहे, याची माहिती आम्हाला देण्यात यावी. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील हे मुद्दे सादर करू शकतात. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी संयुक्त बैठक घेऊन मुद्दे ठरवावे. हे मुद्दे युक्तिवाद करताना सातत्याने तेचतेच मुद्दे येणार नाही. लेखी स्वरूपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. लेखी मुद्दे मांडताना त्याच्याशी संलग्न असलेली कागदपत्रे जोडण्यात यावी. येत्या चार आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. यानंतर आम्ही सुनावणीची पुढील तारीख निश्चित करू, असेही न्यायालयाने सांगितले. ही सुनावणी १६ डिसेंबरआधी होणे आवश्यक आहे. अन्यथा नव्या वर्षात ही सुनावणी होईल. १६ डिसेंबर नंतर न्यायालयाला नाताळाच्या सुट्या लागणार आहेत. या काळात सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड सूत्रे हाती घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या जबाबदारीच्या अनुषंगाने सुनावणीची तारीख निश्चित

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *