सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना सौम्य तापाची लक्षणे असल्यामुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अहवालानुसार, सौम्य तापाच्या लक्षणांमुळे सोनिया गांधींना छातीत संसगार्चीही तक्रार आहे. सोनिया गांधी यांना शनिवारी संध्याकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *