सरकार दणार २५ रु. किलो दरान तादळ

वृत्तसंस्था / २८ डिसेंबर नवी दिल्ली : केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त २५ रुपये प्रती किलो दराने तांदूळ विकणार आहे. याआधी केंद्राने भारत नावाच्या ब्रॅण्डचे डाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर ‘भारत’चाच तांदूळ २५ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने, या तांदळाची योग्यरीत्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. याआधी या ब्रॅण्डच्या डाळींची आणि पिठाचीही विक्री सुरू करण्यात आली आहे. भारत नावाच्या ब्रॅण्डचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीला एका वरिष्ठ अधिकाºयाने दुजोरा दिला.

नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल. केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापाºयांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ २५ रुपये प्रती किलो या दराने उपलब्ध करून देत आहे. मात्र, बासमती तांदळाचे भाव ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करून ठेवणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करून भाव वाढवणाºयांविरोधात अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी २७.५० रुपयांमध्ये मिळणारा ‘भारत आटा’ लाँच केला होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ६ डिसेंबरला दिल्लीत हा आटा लाँच केला होता. भारत नावाच्या ब्रॅण्डचे पीठ सध्या १० आणि ३० किलोंच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. तांदळाप्रमाणेच आटाही नाफेड आणि एनसीसीएफ आणि इतर सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी सरकारकडून अडीच लाख मेट्रिक टन गहू सरकारी संस्थांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.