स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, सुप्त गुणांचे प्रदर्शन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : ग्रामीण विकास संघटना साकोली द्वारा संचालित स्थानीय कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथे स्व. जयंत कटकवार यांच्या जयंती महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले. या शुभप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी धर्मशील गणवीर, भारतीय वनसेवा (आयएफएस) संचालक, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान बस्तर, छत्तीसगड हे जयंती सोहळा व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटक होते. आपल्या भाषणात गणवीर म्हणाले, स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन, स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद होय. आपल्या भाषणात शालेय जीवनात गुणांच्या टक्केवारी पेक्षा आत्मविश्वास व ध्येय निश्चित करून येणाºया परीक्षेला सामोरे जावे यश नक्की मिळेल तसेच आपल्या विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुभवाबद्दल विद्यार्थ्यांशी हितगुज साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय देवगिरकर, प्राचार्य कृष्णमुरारी कटकवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय साकोली यांनी केले. प्रस्ताविकेतून शाळेचा अहवाल वाचून विद्यालयाचा विकासाचा मूलमंत्र व नियोजन सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ग्रामीण विकास संघटनेचे अध्यक्ष श्रीमती विद्याताई कटकवार यांनी स्वर्गीय जयंत कटकवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, साहेबांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले.

साहेबांचे स्वप्न होते की, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय झाली पाहिजे, त्यासाठीच शाळा काढली व आज मला त्याचा आनंद होत आहे की, यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची खूप चांगली सोय झालेली आहे. व शाळेचे नाव संपूर्ण जिल्हाच नव्हे तर राज्यभर नावलौकिक होत आहे. यामध्ये गुणवंत विद्यार्थी, राज्यस्तर खेळाडू, विभागस्तर खेळाडू, गेलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्व. आदित्य बाळबुद्धे स्मृती पारितोषिक प्रदान करण्यात आले. अतिथींच्या आगमनानंतर स्वर्गीय जयंत कटकवार यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण, विज्ञान प्रदर्शनी, ग्लोबल नेचर क्लब, दीप प्रज्वलन व अतिथींचा परिचय घेण्यात आला. कार्यक्रमाला पी. आय. कटरे प्राचार्य के के इंग्लिश स्कूल साकोली, प्रा. विनायक बाळबुद्धे, जी. एस. आवरकर माजी मुख्याध्यापक, पी. ए. मस्के माजी मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे संचालन शिवदास लांजेवार व बाळकृष्ण लंजे तर आभार प्रा. प्रशांत शिवणकर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *