न.प.साकोली तर्फे पीएम आवास योजनेअंतर्गत २७ लाख रुपयांचा निधी वाटप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत न.प.साकोली येथे ४७७ घरकुल मंजूर होते त्यापैकी ३२० लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झालेले असून लाभार्थ्यांना खूप दिवसांपासून शेवटचा हफ्ता मिळालेला नव्हता परंतु राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे औचित्य साधून २९ सप्टेंबर ला सकाळी नगरपरिषदेने प्रधानमंत्री आवस योजनेच्या ५० लाभार्थ्यांना ५०००० रुपयाचा शेवटचा हफ्ता वैयक्तिक शौचालय योजनेचे २२ लाभार्थ्यांना ६००० रुपयाचा दुसरा हफ्ता व १७ लाभार्थ्यांना ६००० रुपयाचा तिसरा हफ्ता असा एकूण २७,३४,००० रुपये निधी थेट लाभार्थ्यांना मुख्याधिकारी रामटेके यांचे हस्ते वाटप करण्यात आला. कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ.रामटेके ,नगर अभियंता यवतकार, पप्रशासकीय अधिकारी स्वप्नील हमाने,घरकुल चे अभियंता शुभम दृगकर,सुभाष बोरकर ,प्रकाश गेडाम,केवळराम इठोले सर्व लाभार्थी उपस्थित होते. आवास योजनेचे बहुप्रतीक्षित असा शेवटचा हफ्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचे सर्व हफ्ते मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *