न.प.ची नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शासनाने नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना तुमसर शहराच्या विविध भागात नायलॉन धागा विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने मांजा विक्री दुकानावर धाडी टाकत तपासणी केली. यामध्ये शिवम राजकुमार जायस्वाल राजेंद्र वॉर्ड हे प्लास्टिक मांजा विकताना मिळाले, महिला पथक व स्वच्छता निरीक्षक मोहन वासनिक यांनी मांजा जप्त करून पाच हजार रुपये दंड वसुल केला. शहरात नायलॉन मांजा विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावले होते. या मांज्यामुळे अनेकांना दुखापती झालेल्या आहेत. त्यामुळे नायलॉन धाग्यावर विक्रीसाठी बंदी आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. याच पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने मांजा विक्री दुकानावर धाडी टाकत तपासणी केली. विक्रेत्यांनी नायलॉन मांजाची विक्री करू नये, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम व आरोग्य निरीक्षक मोहन वासनिक यांनी केले आहे. शहरात कोठे नायलॉन मांजा विक्री होत असेल तर नगरपालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच स्वच्छते संबंधी येणाºया तक्रारीचे निवारण अधिक सुलभतेने व जलद गतीने करता यावे, याकरिता एक नवीन दूरध्वनी क्रमांक ९२२६४५२०४३ जाहीर करण्यात आले आहे. सदर दूरध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे किंवा कॉल किंवा मेसेज करून तक्रारी नोंदवता येईल. या मोहिमेत आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.